मुंबई: आज सेवालाल महाराज याचे पाचवे वंशज अनिल राठोड यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी हा घणाघाती हल्ला चढवला.
यावेळी ठाकरे म्हणाले, राज्यपाल हे राष्ट्रपतींचे प्रतिनिधी असतात. सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयुक्तांच्या नेमकी विषयीची याचिका दाखल करण्यात आली आहे. मला वाटतं राज्यपालांची नियुक्तीही कोणत्या निकषावर व्हावी हे ठरवलं पाहिजे, उगाच माझ्या आजूबाजूचे आहेत म्हणून कुणालाही राज्यपाल करू नये. राज्यपाल पदावर त्या दर्जाचीच लोकं पाहिजे. केवळ माझा माणूस आहे. मग तो बिनडोक असला तरी चालेल पण मी राज्यपाल म्हणून पाठवेल, असं नाही चालणार, असे ठणकावणारे वक्तव्य ठाकरे यांनी केले.
दरम्यान, महाराष्ट्र बंद करण्यात येणार आहे. त्याबाबत सर्व पक्षांशी आमची चर्चा सुरू आहे. जे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत. त्यांनी या विरोधात आवाज उठवला पाहिजे. आम्ही लवकरच त्याबाबतचा निर्णय जाहीर करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.