मुंबई: एकनाथ शिंदे यांनी ‘उठाव’ केल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर शिंदेंना मुख्यमंत्री केल्यानंतर अनेकांना याबाबत प्रश्न पडला होता. पण आता या प्रश्नाचे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे.
शिंदे म्हणाले, “सुरूवातीला मुख्यमंत्री कोण होईल अशी चिंता होती. परंतु हा एक जोरदार, धाडसी माणूस दिसतोय असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना माझ्याबद्दल वाटले. त्यामुळे त्यांनी मला मुख्यमंत्रिपदाची संधी दिली, असे शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, ठाणे महापालिकेच्या वतीने ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या संकल्पनेचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.