कोल्हापूर : एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी संजय राऊत यांचा पक्षातील वाढत्या हस्तक्षेपावर आक्षेप घेत बंड केलं. आता राजेश क्षीरसागर यांनी राऊतांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
राजेश क्षीरसागर म्हणाले, “खासदार संजय राऊत आता पाण्यात बुडवण्याची भाषा करतात.पण मला त्यांना विचारायचं आहे की, तुम्ही शिवसेना अजून किती बुडवणार आहात? तुम्ही कोणाच्या जीवावर निवडून आला आहात? शिंदे गटातील आमदारांवर राग काढण्याआधी खासदारकीचा राजीनामा द्या”, असे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि शिंदेगटाचे नेते राजेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे.