मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं. त्यांच्या विधानावरून साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून रायगडावरून बोलताना त्यांनी राज्यपालांवर हल्लाबोल केला आहे.
उदयनराजे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असं बोलताना त्यांना लाज वाटली पाहिजे त्याची (राज्यपाल कोश्यारी) उचलबांगडी जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, ते जर इथे असते तर त्यांना टकमक टोकावरून ढकलून दिलं असतं, असे वक्तव्य उदयनराजेंनी केले आहे.
दरम्यान, शिवाजी महाराजांचा अवमान यापुढे कुणी करूनच दाखवावा. काय होईल, ते आपल्या परीने आपण बघूनच घेऊ’, अशी घोषणा उदयनराजे भोसलेंनी यावेळी केली.