मुंबई: कर्नाटक सीमावादावरुन राज्यातील वातावरण गरम झाले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या भुमिकेवर राज्यातील विराेधक आक्रमक झाले आहेत. आज संजय राऊत यांनी बाेम्माई यांचा माध्यमांशी बाेलताना समाचार घेतला.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर, कोल्हापूरात भवन उभारण्याची घोषणा केली असेल तर आनंदच आहे. आम्हांला देखील बेळगावात, बंगळूरमध्ये महाराष्ट्र भवन उभे करायचे आहे त्यासाठी जागा द्या अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत म्हणले, मुंबईत देखील कर्नाटकातील लाेकांची भवन आहेत. आमचा वाद नाही तो तुम्ही निर्माण करीत आहेत. परंतु एका इर्षेने काही मागणी कराल तर त्यास आमचा विरोध आहे. त्यामुळे बेळगाव आणि बंगळूर येथे प्रथम महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी आम्हांला जागा द्या असेही राऊत यांनी स्पष्ट केले.