मुंबई: भारतीय क्रिकेट संघ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बांगलादेशात पोहोचला आहे. या मालिकेची सुरुवात रविवारपासून होत आहे. मात्र, या मालिकेआधी भारतीय संघातील महत्वाचा गोलंदाज मोहम्मद शमी हा या मालिकेतून बाहेर झाला आहे. हाताला दुखापत झाल्यानं तो या मालिकेतून बाहेर गेला आहे. या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली.
पीटीआयनुसार, मोहम्मद शमी अलीकडेच ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी २० विश्वकपमध्ये खेळला होता. त्यानंतरच्या मालिकेत त्यानं विश्रांती घेतली होती. त्यामुळे तो न्यूझीलंड दौऱ्यात सहभागी झाला नव्हता. बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत तो खेळणार होता. पण आता दुखापतीमुळं तो संघाबाहेर झाला आहे. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत शमीकडे गोलंदाजीची प्रमुख जबाबदारी आहे.

दरम्या, शमी आता बाहेर गेल्यानं टीम इंडियाचं टेन्शन वाढले आहे.