अक्कलकोट: अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील तब्बल अठ्ठावीस गावाच्या सरपंच अन् ग्रामस्थ्यांनी कर्नाटकात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती.
त्यातच महाराष्ट्रात राहणा-या कर्नाटकातील लाेकांनी त्यांना कर्नाटकात जाण्यासाठी लोकांची माथी भडकावली तर त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करू अशा इशारा साेलापूर जिल्हा पोलिसांनी ग्रामस्थांना दिला आहे. तसेच, रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या सुविधा मिळत नसल्याने गावक-यांनी आंदोलन केले.

दरम्यान शिवानंद बोळेगाव म्हणाले आमच्या आंदाेलनानंतर आम्हांला कुठल्याही परवानगी शिवाय आंदोलन न करण्याची पोलीसांनी सूचना केली आहे.