Latest Marathi News

आजचे राशीभविष्य, शनिवार ३ डिसेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 699

 

मेष:-
गृहसौख्याकडे विशेष लक्ष द्यावे. आध्यात्मिक प्रगती चांगली करता येईल. मनात नसत्या चिंता निर्माण होऊ शकतात. अति विचारात गुंतून जाऊ नका. कर्जाची प्रकरणे आज टाळावीत.

 

Manganga

वृषभ:-
काही नवीन खरेदी केली जाईल. नवीन मित्र जोडता येतील. मनातील आकांक्षा पूर्ण होईल. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. स्वकष्टावर भर द्यावा.

 

मिथुन:-
आज कामात फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत. व्यवसायात चांगला लाभ मिळेल. कमिशनमध्ये लाभ होईल. बँकेची कामे सुरळीत पार पडतील. वडीलांकडून मदत घेता येईल.

 

कर्क:-
मानसिक समाधान लाभेल. आत्मविश्वासाने वागाल. आपल्या आवडत्या कामावर लक्ष द्यावे. दिवस मौजमजेत घालवाल. सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा.

 

सिंह:-
आज उधार देणे टाळावे. एखादी चांगली संधी चालून येईल. धार्मिक स्थळाला भेट देता येईल. दानधर्म कराल. परदेशी गुंतवणुकीतून लाभ संभवतो.

 

कन्या:-
जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराच्या हट्टाला बळी पडाल. भागीदाराशी सलोखा वाढेल. जनसंपर्कात वाढ होईल.

 

तूळ:-
परिस्थितीला नवे ठेऊ नका. अनोळखी व्यक्तींपासून सावध राहावे. उगाच चिडचिड करू नका. मनात अकारण भीती निर्माण होऊ शकते. कोणावरही चटकन विश्वास ठेऊ नका.

 

वृश्चिक:-
मित्रांशी लावलेली पैज जिंकाल. आपले आवडते छंद जोपासा. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. त्यांच्या आनंदाने खुश व्हाल. कष्ट न करता पैसे कमावण्याकडे कल राहील.

 

धनू:-
मनातील चिंता दूर साराव्यात. कौटुंबिक सौख्यात दिवस घालवाल. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. मानसिक समाधान लाभेल. जवळचे नातेवाईक भेटतील.

 

मकर:-
कसलीही हार मानू नका. लहान प्रवास घडेल. मानसिक चांचल्य जाणवेल. कामात पत्नीची साथ मिळेल. भावंडांशी सुसंवाद साधला जाईल.

 

कुंभ:-
फसवणुकीपासून सावधानता बाळगा. कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्यावे. मामाकडून मदत घेता येईल. चोरांपासून सावध राहावे. जामीनकीचे व्यवहार आज टाळावेत.

 

मीन:-
शैक्षणिक प्रश्न सुटेल. दिवस आनंदात जाईल. प्रकृतीत सुधारणा होईल. मुलांच्या हुशारीने हुरळून जाल. त्यांचे कोडकौतुक कराल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!