खरसुंडी : खरसुंडी (ता.आटपाडी) येथील श्रीमती पद्मिनी शामराव भिसे (वय.८५) यांचे वृद्धापकाळाने आज दुपारी दुःखद निधन झाले. खरसुंडीचे माजी उपसरपंच कालकथित शामराव भिसे यांच्या त्या पत्नी होत. तर पंचायत समिती सदस्या सारिका भिसे यांच्या सासू होत्या.
त्यांच्या पश्चात ४ मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. अंत्यविधी उद्या दिनांक ३ डिसेंबर रोजी सकाळी ९.०० वाजता खरसुंडी येथे होणार आहे.
