मुंबई: महाराष्ट्रातील सीमावादाचा मुद्दा पेटलेला असताना कर्नाटक सरकारने सांगलीतील गावांना पाणी देऊन महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. आता याला प्रत्तुत्तर म्हणून महाराष्ट्र सरकारने सीमा भागातील गावांना आकर्षित करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.
माहितीनुसार, सीमा प्रश्नावरून दोन राज्यात वाद उफळून आल्याने सीमा भागातील गावांना आकर्षित करण्यासाठी आणि त्या गावांमध्ये मराठीच्या संवर्धनासाठी प्रत्येक गावाला २ लाख ते जास्तीत जास्त १० लाख रुपये देण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. येणाऱ्या कॅबिनेट बैठकीत या निर्णयाला मंजूरी दिली जाणार असल्याचे समजत आहे.

दरम्यान कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये असा इशाराच बोम्माईंनी दिला आहे. त्यामुळे येत्या काळात सीमावाद पेटणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.