राज्यपालांनी शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यभरातून या वक्तव्याचे पडसाद उमटत आहेत. अशातच आत उदयनराजे भोसले यांनी मुंडक छाटण्याची भाषा केली आहे, यावर संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
उदयनराजे भोसले यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतीत महाराष्ट्राच्या भावना तीव्र आहेत. त्या भावनांचा स्फोट उदयनराजे यांच्या वाणीतून होत असतो. ते सातारच्या गादीचे छत्रपती आहेत. त्यांच्या मनातून चिड बाहेर येणं स्वाभाविक आहे. त्यांनी मुंडक छाटण्याची भाषा न करता आधी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा. भाजपनं आमच्या दैवताचा आपमान केला आहे.

उलट त्यांचं समर्थन केलं जातं. अशावेळी त्या पक्षात राहणं योग्य नाही, असं मला वाटतं, असं शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले.