Latest Marathi News

BREAKING NEWS

 

“….तेव्हा जनता कॉंग्रेसला त्यांची जागा दाखवेल”: देवेंद्र फडणवीस!

0 218

गुजरात: कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना रावणाची उपमा दिली होती, त्या वक्तव्याचा फडणवीसांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ज्यांना रामाचं अस्तित्व मान्य नाही त्यांनी आज रावण आठवतोय अशी बोचरी टीका फडणवीसांनी केली आहे.

 

 

फडणवीस म्हणाले, माझा प्रश्न आहे की रावणाच्या पाठीशी कोण उभे आहे? ज्याने रामलल्लाचे अस्तित्व नाकारले की राम मंदिर बांधणारे मोदी? 700 वर्षांचा कलंक पुसून मोदी रामलल्लाच्या मंदिराच्या उभारणीला सुरुवात करत होते, तेव्हा तीच काँग्रेस विचारत होती की रामलल्लाचा जन्म झाला का? त्यामुळेच आज काँग्रेस येथे उभी आहे, तसेच जेव्हा जेव्हा काँग्रेस आणि विरोधक मोदींना शिव्या देतात तेव्हा जनता त्यांना पूर्वीपेक्षा जास्त मतांनी विजयी करून कॉंग्रेसला त्यांची जागा दाखवते. मला माफ करा, मी असे शब्द वापरत आहे, परंतु कधीकधी अशा शब्दांचा वापर करणे आवश्यक होते असा टोलाही फडणवीसांनी लगावला आहे.

 

दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाला सुरूवात झालेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या अहमदाबादमध्ये आहे. गुजरात निवडणुकीसाठी ते स्टार प्रचारकांच्या यादीत आहे. यावेळी एका सभेत ते बोलत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.