बेंगळुरू: कर्नाटक आणि महाराष्ट्रा दरम्यान सीमावाद सुरू असतानाच कर्नाटक सरकारने एक फतवा काढला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील कोणत्याही मंत्र्यांना बेळगावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
माहितीनुसार, महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये असं पत्रं कर्नाटक सरकारने महाराष्ट्र सरकारला पाठवलं आहे. कर्नाटक सरकारच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना हे पत्रं पाठवलं आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये, असं या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने सीमावादावर तोडगा काढण्यासाठी समन्वय समिती स्थापन केली आहे. या समन्वय समितीत चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई आहेत. हे दोन्ही मंत्री डिसेंबर 6 डिसेंबर रोजी कर्नाटकात जाणार होते. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने हे पत्र पाठवले आहे.