मुंबई : संजय राऊत हे आज नाशिक दौऱ्यावर असतांना त्यांनी शिंदे गटाने राजकीय कबर खोदली आहे. ते प्यारे झाले म्हणत सडकून टीका केली होती. त्याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे.
यावेळी शिरसाठ म्हणाले, “संजय राऊतला पिसाळलेलं कुत्र चावलेलं आहे, स्वतःच घरं सांभाळ ना ? अकलेचे तारे कशाला तोडायला लागला ? हाच माणूस राज्यसभेच्या वेळेला आमच्या पाया पडत होता. आम्ही मतदान केलेलं, म्हणून निवडून येतो, दरवेळेला मतदान करतो आणि हा आम्हाला सांगणार काय ? हा काय आमच्या मतदार संघात येतो का ? याच्या जिवावर थोडीच आमची निवडणूक चालते असे विविध सवाल उपस्थित करत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे.

तसेच, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठी यांनी जोरदार हल्लाबोल करत स्वतःच आमच्या जिवावर निवडून येतो आणि तो काय सांगणार असं म्हणत शिरसाठ यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे.