नाशिक: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील चिंचवे येथून साक्री येथे विवाह समारंभासाठी जाणाऱ्या वऱ्हाडाच्या खासगी बसला धाकड बारीत अपघात झाला. या अपघातात दोन वऱ्हाडींचा मृत्यू झाला तर १० हून अधिक वऱ्हाडी जखमी झाले आहेत.
माहितीनुसार, धाकड बारी जवळ बस पोहचताच अपघाती वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस बारीत कोसळली. त्यावेळी चालकाने धावत्या बसमधून बाहेर उडी घेतली. यावेळी वाहनाने घेतलेल्या चार ते पाच पलटीमुळे वाहनातील दोन वऱ्हाडींचा मृत्यू झाला तर १० हून अधिक वऱ्हाडी जखमी झाले आहेत.

दरम्यान, या अपघातात मखमलाबाई ह्याळीज (वय ६०) , मयुरी बोरसे (वय ११) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच अन्य प्रवासी जखमी झाले आहेत.