मुंबई : शिंदे गटात ठिगण्या उडत असून लवकरच त्याचा स्फोट होईल, या राऊतांच्या दाव्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी टीका केली आहे.
संजय राऊत ज्यावेळी बोलतात, त्यावेळी एका हिंदी चित्रपटाचं गाणं आठवतं. पिंजरे मे पोपट बोले अशा पद्धतीने कुरमुड्या ज्योतिषीसमोरील जे कार्ड असतं तो ते कार्ड उचलतो आणि जे कही बोलायचं आहे ते बोलतो. अशा पद्धतीने कुरमुडे ज्योतिषी जे आहेत राऊत साहेब, रोज सकाळी उठतात कार्ड उचलतात आणि बोलायला सुरुवात करतात, असे टीकास्त्र म्हस्केनी राऊत सोडले आहे.

तसेच ते पुढे म्हणाले, “संजय राऊत साहेब रोज तुम्ही ज्या आमदार-खासदारांच्या नावाने खडे फोडताय, त्यांच्याच मतांवर तुम्ही खासदार म्हणून निवडून आला आहात. गद्दारांची मत तुम्हाला चालली का? हिम्मत असेल तर राजीनामा द्या आणि उतरा रिंगणात, असं आव्हानही त्यांनी संजय राऊतांना दिलं.