नाशिक: राज्यपाल यांच्या वादग्रस्त विधानावरून संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत असतांना पंतप्रधान मोदींचा एक संदर्भ देत महाराष्ट्राचा अपमान झाला आहे हे ठासून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
राऊत म्हणाले, कॉँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शंभर तोंडाचा रावण असल्याचे म्हंटले होते, त्यावर मोदींनी अश्रु ढाळत हा माझा अपमान नसून गुजरातचा अपमान आहे असं म्हंटलं होतं. तर मग छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्यावर महाराष्ट्राचा अवमान होत नाही का ? असा संतप्त सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये केला आहे.

तसेच ते पुढे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील हेच का तुमचं प्रेम ? हीच का तुमची आस्था असे, सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे.