पुणेः मनसे नेते प्रकाश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेनेतील अंतर्गत मतभेदांबाबत वक्तव्य केले आहे. शिवसेनेत काही दिवसांपूर्वीच आलेल्या सुषमा अंधारे यांच्यामुळे, त्यांच्या भाषणांमुळे पक्षातील महिला नेत्यांची कारकीर्द झाकोळली गेल्याची टीका प्रकाश महाजन यांनी केली.
प्रकाश महाजन म्हणाले, आम्ही दोघंही बीड जिल्ह्यातले आहोत. या बाईला काय बोलावं कळत नाही. तिला बोलायला ठेवलंय. भुंकायला नाही. मेंदूला नारू झालाय की काय तिच्या?, असे वक्तव्य प्रकाश महाजन यांनी केले.
तसेच, ते पुढे म्हणाले , “काही महिन्यांपूर्वी सेनेत पुरुषांचं बंड झालं. आता राहिलेल्या सेनेत बायकांचं बंड होणार आहे. उठ बस ठणाणणा करणारी सेना आहे, त्यात आता बायकांचं बंड होणार आहे. या बाईमुळे ज्या उजेडात बायका होत्या, त्या अंधारात गेल्या आहेत, त्या गप्प बसणार नाहीत, असा इशारा प्रकाश महाजन यांनी दिला आहे.