मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर भूमी सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. नुकतेच भूमीने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यामुळे तिला ट्रोल करण्यात येत आहे. भूमी पेडणेकरचा लूक पाहून तिची तुलना उर्फी जावेदशी करण्यात येत आहे.
अभिनेत्री भूमी पेडणेकर शेअर केलेल्या तिच्या फोटोमध्ये तिने नेव्ही ब्लू रंगाची साडी नेसली आहे. तसेच तिने या साडीवर मारून रंगाचा डिपनेक ब्लाऊज घातला आहे. या आऊटफिटवर भूमीने न्यूड मेकअप केला आहे. या लूकला पूर्ण करण्यासाठी भूमीने गळ्यात चोकर आणि हातात कडे घातले आहेत.
दरम्य्ना, भूमीच्या फॅशन सेन्सची तुलना चाहते अभिनेत्री आणि सोशल मीडिया सेंसेशन उर्फी जावेदशी केली जात आहे. एका नेटकाऱ्याने भूमीच्या पोस्टवर ‘उर्फी जावेद २.०’ अशी कमेंट देखील केली आहे.
