Latest Marathi News

अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नीनेच केली हत्या!

0 518

मुंबई: मुंबईतील सांताक्रूझ परिसरात अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या पती कमलकांत याची पत्नीनेच जेवणातून विष देत हत्या केली आहे.

 

माहितीनुसार, आरोपी महिला कविता हिचे अनैतिक संबंध होते. कविता आणि पती कमलकांत हे दोघे सांताक्रूझ परिसरातील दत्तात्रेय रोड भागातील एका सोसायटीत राहत होते. त्यांना दोन मुले आहेत. अनैतिक संबंधांमध्ये कमलकांत हा अडथळा ठरत होता. हा अडथळा कायमचा दूर करायचा असा कट महिलेने प्रियकरासोबत संगनमत करून आखला. जूनमध्ये कवितानं प्रियकराच्या मदतीने कमलकांतच्या जेवणात विष टाकले. त्यानंतर कमलकांत याला रुग्णालयात दाखल केले होते. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Manganga

 

दरम्यान, पोलिसांनी सुरुवातीला सांताक्रूझ पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद केली. सांताक्रूझ पोलिसांनी तपास सुरू केला. तपास सुरू असतानाच कमलकांत याची विष देऊन हत्या केल्याची बाब समोर आली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवून कविता आणि तिचा प्रियकर हितेश या दोघांना अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!