Latest Marathi News

BREAKING NEWS

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात सापडल्या सोन्याच्या खाणी!

0 678

मुंबई: महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या दोन सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत. याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते.

 

सोन्याच्या खाणीबाबत माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘सोन्याचे दोन ब्लॉक असल्याची माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. आमच्या सरकारच्या काळात हे सोने निघाले तर ती राज्यासाठी खूप मोठी उपलब्धी असेल. राज्यात खनिकर्म क्षेत्राला मोठा वाव असून गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्प सुरू करु शकतो’, असा विश्वासही शिंदेंनी यावेळी व्यक्त केला.

Manganga

 

दरम्यान, मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये खाण क्षेत्रातील संधी या गुंतवणूकदारांच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शिंदे यांनी हा खुलासा केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!