Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, शुक्रवार २ डिसेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 816

 

मेष:-
मनाच्या चंचलतेला आवर घालावी. डोळ्यांची काळजी घ्यावी. बहु राष्ट्रीय कंपनीत काम करणार्‍यांना दिवस चांगला जाईल. मनात नसत्या शंका आणू नका. अवांछित खर्च सामोरे येऊ शकतात.

 

 

Manganga

वृषभ:-
आवडीची खरेदी केली जाईल. आज विविध स्तोत्रातून लाभ मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मित्रांमध्ये तुमची प्रशंसा केली जाईल. भावंडांसोबत दिवस मजेत घालवाल.

 

 

मिथुन:-
दिवसभर कामाची धांदल राहील. एकाचवेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. वरिष्ठ नवीन जबाबदारी देऊ शकतात. कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम पहायला मिळतील. आर्थिक गणित सोडवता येईल.

 

 

कर्क:-
धार्मिक बाबीत रस घ्याल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. धार्मिक स्थळाला भेट द्याल. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. मनातील समस्या दूर कराव्यात.

 

 

सिंह:-
जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. पोटाचे विकार संभवतात. अचानक लाभाची शक्यता. मनातील भलत्या चिंता बाजूला साराव्यात. त्रासदायक गोष्टींपासून लांब राहावे.

 

 

कन्या:-
उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. संध्याकाळी एखादे सरप्राइज मिळेल. भागीदारीत चांगला नफा मिळेल. जनसंपर्कात वाढ होईल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

 

 

तूळ:-
इतरांच्या बोलण्याचा मनावर परिणाम होऊ शकतो. बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे. उगाचच चिडचिड होऊ शकते. आत्मविश्वास सोडून चालणार नाही. क्षुल्लक गोष्टी मनाला लावून घेऊ नका.

 

 

वृश्चिक:-
आपले छंद जोपासावेत. आजोळच्या नातेवाईकांची गाठ पडेल. विद्यार्थ्यांना चांगला दिवस. जुगारातून लाभ संभवतो. प्रेमातील लोकांना एकत्र वेळ घालवता येईल.

 

 

धनू:-
घरातील ज्येष्ठांची सेवा करता येईल. जवळचा प्रवास सुखाचा होईल. अधिक वेळ घरगुती कामात घालवाल. वाहन खरेदीची इच्छा पूर्ण करता येईल. कौटुंबिक जीवनात चांगले बदल होतील.

 

 

मकर:-
रखडलेली कामे तडीस नेता येतील. लहान भावंडांचा हातभार लागेल. अचानक जुने मित्र भेटतील. प्रेक्षणीय स्थळाला भेट द्याल. आपल्यातील सकारात्मक ऊर्जेचा वापर करावा.

 

 

कुंभ:-
इतरांना बोलण्यातून जिंकू शकाल. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. लहान व्यवसायिकांना चांगला नफा मिळेल. सांपत्तिक स्थिती सुधारेल. व्यापारी वर्ग खुश असेल.

 

मीन:-
आजचा दिवस मनाप्रमाणे घालवाल. आज लोक तुमच्यावर व्यक्तिमत्वावर आकर्षित होतील. प्रेमळपणे सर्वांच्या मनात घर कराल. विश्वासू मित्रांची साथ घ्यावी. लोकांवर तुमची चांगली छाप पडेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!