मुंबई :महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उमेदवारी दिलेल्या 111 जणांच्या नियुक्तीला मुंबई उच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली आहे.
माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना EWS प्रवर्गातून नियुक्तीपत्र देता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयात या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याच्या विरोधात तातडीची याचिका दाखल करण्यात आली होती.संबंधित याचिका दाखल करणाऱ्या तीन EWS उमेदवारांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

ज्या 111 उममेदवारांना नियुक्ती पत्र देण्यास स्थगिती देण्यात आलीय त्यांनी सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र त्या उमेदवारांना EWS प्रवर्गातून नियुक्तीपत्र देण्यात येणार होतं. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठापुढे आज संध्याकाळी झालेल्या तातडीच्या सुनावणी दरम्यान याबाबत निकाल देण्यात आला.
दरम्यान, सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या या उमेदवारांना EWS प्रवर्गातून नियुक्तीपत्र देण्यावर हायकोर्टाच्या स्थगितीमुळे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देता येणार नाही.