Latest Marathi News

हट्ट पूर्ण न केल्याने १० वर्षीय मुलाने आईची केली हत्या!

0 350

नवी दिल्ली: अमेरिकेत एका १० वर्षांच्या मुलाने आईने हट्ट पूर्ण न केल्याने तिची गोळी झाडून हत्या केली आहे. सध्या हा मुलगा पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर हत्येच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे.

 

याबद्दल अधिक माहिती अशी कि, सदर घटना २१ नोव्हेंबर रोजी अमेरिकेतील मिलवॉकी येथे घडली आहे. मुलाची मावशी आणि बहिण यांनी सांगितले की, त्याला वर्चुअल रियालिटी हेडसेट पाहिजे होता. यासाठी त्याने दोन दिवस आईकडे हट्ट केला. मात्र आईने हेडसेट देण्यास नकार दिल्याने त्याने तिच्यावर गोळी झाडली. आईचा मृत्यू झाला आता आई आपल्याला परत कधीच नाही दिसणार याचे त्याला जराही दु:ख झाले नाही. त्याने लगेच दुसऱ्या दिवशी आईच्या अॅमेझॉन अकाउंट वरून वर्चुअल रियालिटी हेडसेट ऑर्डर केला. तसेच त्याच दिवशी त्याने ७ वर्षीय चुलत भावावरही हल्ला केला, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.

Manganga

 

दरम्यान, पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी चौकशीसाठी मुलाला ताब्यात घेतले. सुरूवातीला त्याने चुकून गोळी लागल्याचे सांगितले. मात्र नंतर त्याने स्वत:हून आपल्या गुन्ह्याची कबूली दिली. तो मनोरुग्ण असल्याचे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तसेच, पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!