मुंबई:. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आज, गुरुवारी तातडीची बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळ वाटपावर चर्चा होणार असून, येत्या १३ डिसेंबर २०२२ ला राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे.
माहितीनुसार, हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळ वाटपासाठी सत्ताधारी आमदारांकडून दबाव आहे. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्यासाठी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी निघाले आहेत.

दरम्यान, आज, गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक होणार आहे.