पुणेः पुण्यातील शिरूर येथे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवनेरीवर येऊ दिले जाणार नाही, असा इशारा दिला होता.यावर दीपक केसरकर यांनी कोल्हे यांना प्रत्युत्तर दिले.
दीपक केसरकर म्हणाले, “कुणीही उठायचं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घसरायचं, हे योग्य नाही, अशी संतप्त टीका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.

तसेच, छत्रपतींचा वारंवार होणार अवमान आम्ही सहन करणार नाहीत, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपतींबद्दल काहीच वादग्रस्त बोलले नाहीत, असं केसरकर म्हणाले.