मुंबई : मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या आग्याहून सुटकेशी केली.यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
पटोले म्हणाले,“छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भाजपाच्या वतीने मलीन केली जात आहे. पण त्यांनी कितीही अवमान केला तरीही शिवरायांचा विचार संपणार नाही. माझं आवाहन आहे की महाराजांच्या विचारांनी प्रेरित असलेले आमदार जे आहेत. त्यांनी महाराजांचा स्वाभिमान असेल तर त्यांनी राजीनामे दिले पाहिजेत”, असे नाना पटोले म्हणालेत.
तसेच ते पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री राजीनामा देणार नाहीत. कारण मोठ्या भीतीने ते मुख्यमंत्री झाले आहेत. एकीकडे महाराजांच्या नावाचा गवागवा करायचा आणि दुसरी कडे अपमान करायचा हे भाजप करत आहेत. हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं नाही, असेही नाना पटोले म्हणाले आहेत.