Latest Marathi News

BREAKING NEWS

“तुम्ही एमपीएससी नाही झाला तर आमदार, खासदार…..”: आमदार गोपीचंद पडळकर!

0 582

पुणे: आमदार गोपीचंद पडळकर पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. यावेळी त्यांनी हा अजब सल्ला दिला.

आमदार पडळकर म्हणाले, तुम्ही एमपीएससी नाही झाला तर गावाकडं सरपंचाची पोस्ट तुमची वाट पाहत आहे. एमपीएससी नाही झाला तर पंचायत समितीच्या सदस्यपदाची जागा वाट पाहत आहे. तुम्हाला सभापती होता येईल, झेडपी मेंबर होता येईल. एमपीएससी नाही झाला तर आमदार, खासदार होता येईल. इथे स्पर्धा मोठी आहे. जो तो म्हणतो एमपीएससीत स्पर्धा मोठी आहे. पण तसं नाही. इथे 12 कोटीतून 288 आमदार विधानसभेत आहेत. ही किती मोठी स्पर्धा आहे, असे त्यांनी वक्तव्य केले.

Manganga

 

तसेच ते पुढे म्हणाले, “निवडणुकीत पडला म्हणून माजी आमदाराने आत्महत्या केली असं कधी तुम्ही ऐकलंय? ऐकलं का तुम्ही? मंत्रीपदाच्या यादीत नाव आलं नाही म्हणून या या आमदाराने आत्महत्या केली असं ऐकलं का? मग त्यांना काय निराशा आली नसेल तर? असा सवालही त्यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!