Latest Marathi News

BREAKING NEWS

मुंबईसह देशातील ‘या’ शहरांना मिळणार जलसमाधी?

0 774

मुंबई: मुंबईसह देशातील कोची, मंगळुरू, चेन्नई, विशाखापट्टणम आणि तिरुअनंतपुरम येथील किनारी भाग पाण्याचीखाली जाण्याचा धोका आहे. येत्या आठ वर्षात म्हणजे 2030 पर्यंत या शहरांच्या काही भागांना जलसमाधी मिळण्याची शक्यता आहे.

 

समुद्राची पातळी वाढल्यांतर काही लोकांना त्यांची घरे आणि व्यवसाय सोडावे लागतील. राहण्याची जागा बदलावी लागेल. 2050 पर्यंत तर या शहरांची स्थिती आणखी बिकट होईल. समुद्राच्या वाढत्या पाण्याच्या पातळीचा मुंबईतील किमान 1000 इमारतींना फटका बसणार आहे. किमान 25 किमी लांबीचा रस्ता खराब होईल.जेव्हा भरती येईल तेव्हा 2490 इमारती आणि 126 किलोमीटर लांबीचा रस्ता पाण्याखाली जाईल.

Manganga

 

 

2050 पर्यंत तापमानात 2 अंश सेल्सिअसने वाढ झाली तर या चक्रीवादळ आणि वादळांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल. ती तीन पटीने वाढू शकते. तापमान इतके वाढले की हिमनद्या वितळतील. नासाच्या प्रोजेक्शन टूलमध्ये जगाचा नकाशा बनवण्यात आला आहे. ज्यात कोणत्या वर्षी जगाच्या कोणत्या भागात समुद्राची पातळी किती वाढेल. यात 2100 पर्यंत भारतातील 12 शहरे अर्ध्या ते तीन फुटांपर्यंत समुद्राच्या पाण्यात बुडतील. कारण तोपर्यंत उष्णता इतकी वाढेल की समुद्राच्या पाण्याची पातळीही वाढेल.

 

RMSI या संस्थेने यावर्षी जुलैमध्ये एक अभ्यास केला होता. ज्यामध्ये हाजी अली दर्गा, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, वांद्रे-वरळी सी लिंक, मरीन ड्राईव्हवरील क्वीन्स नेकलेस, हे सर्व बुडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचतील, असे म्हटले होते. RMSI ने IPCC च्या सहाव्या हवामान मूल्यांकन अहवालातून हे विश्लेषण केले आहे. अशी स्थिती केवळ मुंबईतच होणार नाही तर कोची, मंगलोर, चेन्नई, विशाखापट्टणम आणि तिरुअनंतपुरमलाही वाढत्या समुद्र पातळीचा फटका सहन करावा लागणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!