अमरावती: मुंबई सत्र न्यायालयाने अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे.

माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोरील हनुमान चालीसा प्रकरणानंतर राणा दाम्पत्याविरोधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी दोघांनाही अटक केली होती. यानंतर न्यायालयाने रवी राणा आणि नवनीत राणा यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच पोलीस तपासात कोणतेही अडथळे आणू नये, असे आदेश न्यायालयाने त्यांना दिले होते. त्याचबरोबर सुनावणीवेळी न्यायालयात हजर राहण्याची अटही त्यांना घालण्यात आली.
दरम्यान, राणा दाम्पत्याला 11 नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्याचे निर्देश दिलेले असतानाही ते सतत गैरहजर राहिल्यानं कोर्टानं जामीनावावर वॉरंट जारी केलं आहे. सदरील वॉरंट हे जामीनपात्र असून 5 हजार रुपयांच्या जामीनावावर वॉरंट रद्द करता येणार आहे.