मुंबई: राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील एका प्रसंगाशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी तुलना केली आहे. त्यावरून आता माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर हल्ला चढवला आहे.
“इमान विकलेल्या गद्दारांची तुलना छत्रपती शिवरायांशी करणं हे हिंदुत्व नाही, हा महाराष्ट्र द्वेष आहे! ‘महाराष्ट्राचं खच्चीकरण’ हेच या खोके सरकारचं ध्येय आहे!, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

दरम्यान, मंगलप्रभात लोढा यांनी काल शिवप्रताप दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरच शिंदे यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एका प्रसंगाशी केली होती. त्यामुळे आज ठाकरे गटाने मुंबईत लोढांच्या विरोधात जोरदार निदर्शने करून त्यांचा निषेधही नोंदवला.