औरंगाबाद : ठाकरे गटाच्या शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. चंद्रकांत खैरे हे मीडियाशी संवाद साधत होते. त्यावेळी ते बोलत होते.
खैरे म्हणाले, “शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ आहेत. हे आमदार कोणत्याही क्षणी फुटण्याची शक्यता आहे. ते फुटू नयेत म्हणून या आमदारांना पुन्हा प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तसेच, एका उद्योगपतीनेच आपल्याला ही माहिती दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे, असा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांकडे या सरकारचं दुर्लक्ष आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या आहेत. वीज बिल थकल्याने त्यांना पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकरी तणावात आहेत. त्यांच्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय नाही. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या करू नका म्हणून आवाहन केलं आहे.