मुंबई: मुंबईच्या कल्याण स्टेशन परिसरात एका १५ वर्षीय मुलाने ८ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केला. त्यानंतर ब्लेडने वार करून तिची हत्या केली.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, शुक्रवारी सकाळच्या सुमारास कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील न्यू मोनिका इमारतीच्या आवारात एका ८ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. स्थानिक नागरिकांनी याबाबत महात्मा फुले पोलिसाना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

मृत मुलीच्या वडिलांनी १५ वर्षीय मुलाला मारले होते. याच गोष्टीचा राग मनात धरून त्याने या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचं निष्पन्न झाले.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं. दोघेही अल्पवयीन असून एकाचे वय १५ वर्ष असल्याची माहिती आहे. तसेच या घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.