मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र ऑफलाईन सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. जिल्ह्याच्या 113 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने ऑफलाईन अर्ज सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे.
विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढवण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अर्ज सादर करताना अडचण येत होती.त्यामुळे हि मुभा देण्यात येत आहे.
अर्ज दाखल करण्याची मुदत – 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर
अर्ज छाननी – 05 डिसेंबर
अर्ज मागं घेण्याची तारीख – 7 डिसेंबर
मतदान – 18 डिसेंबर
मतमोजणी आणि निकाल – 20 डिसेंबर