नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावरून चांगलाच राजकारण तापलं आहे. त्यातच आता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या एका विधानावरून खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्र सोडलं आहे.
राऊत म्हणाले, खोके सरकार आणि राज्यपाल यांच्यात कोण शिवाजी महाराजांचा जास्तीत जास्त अपमान करेल यासाठी स्पर्धा सुरू आहे. त्यात आता मंगलप्रभात लोढाही त्यात सामील झाले आहेत. या स्पर्धेसाठी दिल्लीनं मोठं बक्षीस लावलंय का कौन बनेगा करोडपतीसारखं? ‘कौन करेगा छत्रपतीका अपमान’ असंच दिसतंय. छत्रपतींच्या आग्र्याहून सुटकेची तुलना तुम्ही बेईमान लोकांच्या बंडखोरीशी करत असाल, तर त्याला योग्य पद्धतीने लवकरच उत्तर दिलं जाईल”, अशा शब्दांत संजय राऊतांनी मंगलप्रभात लोढांच्या विधानाचा समाचार घेतला.

तसेच ते पुढे म्हणाले, “सुधांशू त्रिवेदींनी छत्रपतींना माफीवीर ठरवलं, राज्यपालांनी छत्रपती जुने झाले असं सांगितलं आणि आता पुन्हा एकदा छत्रपतींची तुलना एका बेईमान व्यक्तीशी करून महाराष्ट्राचा अपमान केला आहे. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना लवकरच सडेतोड उत्तर मिळेल, असं राऊत म्हणाले.