Latest Marathi News

BREAKING NEWS

दुसरीही मुलगीच झाल्यानं पत्नीला संपवलं; नंतर पतीनेही…..!

0 441

मेहुणबारे (जळगाव) : चाळीसगाव शहरातील जुना कारगाव रोड भागात दुसरी मुलगीच झाली म्हणून हताश झालेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करत खून केला. तर त्याने देखील धावत्या रेल्वेखाली आपला जीव देऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

 

चाळीसगाव शहरातील जुना करगाव रोड भागालगत असलेल्या जय गणेशनगरमध्ये वास्तव्यास असलेल्या सुरज दिलीप कुऱ्हाडे (वय २८) व रेश्मा सुरुज कुऱ्हाडे (वय २४) हे दोन्ही पती पत्नी हे आपला संसार गुण्यागोविंदाने करत होते. दोन्ही पती– पत्नी रस्त्यााचे खड्डे खोदण्याचे काम करुन पोटाची खळगी भरत होते. त्यातच सुरजला दारुचे व्यसन जडले होते.

Manganga

 

सुरज व रेश्माला पहिली दिड वर्षीची मुलगी होती. त्यातच सुरजला दारुचे व्यसन जडले होते. या दारुच्या व्यसनाने पती– पत्नीचे नेहमी वाद व्हायचे, त्यातच रेश्माला दुसरीही मुलगी झाल्याने मुलगी झाल्याने तिचा पती सुरज हा खूप दुःखी झाला. जन्माला आलेली दुसरी मुलगी ही तीन महिन्याची झाल्यानंतर सुरज त्या मुलीला व पत्नीला घेण्यासाठी (२५ नोव्हेंबर) जुणोवने (ता.धुळे) येथे गेला व आपल्या सासरवाडीला दोन दिवस थांबला. त्यानंतर तो (२८ नोव्हेंबर) आपल्या घरी चाळीसगाव येथे पत्नी व मुलींना घेऊन आला.
सुरज व रेश्मा यांनी नेहमी प्रमाणे जेवण केले. सुरज हा दारु पिलेला होता. आज (ता.३०) पहाटे लहान मुलीचा रडण्याचा आवाज येत असल्याने शेजारी राहात असलेले त्याच्या नातेवाईकांनी घरात जावून पाहिले असता रेश्मा ही रक्ताच्या थारोळ्यात मृत आवस्थेत आढळुन आली. मात्र रेश्माच्या डोक्यात कुर्हाडीने वार करुन ठार केले. त्याठिकाणी सर्व नातेवाईक आल्यानंतर त्यांनी सदरील घटना रेश्माच्या माहेरी जुणोवने (ता.धुळे) येथे सांगितली. परंतु तिचा पती सुरज हा तेथे नसल्याने सर्वजण चक्रावून गेले.

 

सुरज राहत असलेल्या घरापासून काही अंतरावर धुळे रेल्वे पटरीवर रेल्वेच्या खाली एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्या ठिकाणी जमलेले सर्व नातेवाईक त्या दिशेने पळत गेल्यावर तो मृतदेह हा सुरजचा असल्याने एकच खळबळ उडाली. सुरज याने आधी आपल्या पत्नीला संपवले. यानंतर त्याने स्वतः रेल्वे खाली आपला जीव देऊन आत्महत्या केली. या प्रकरणी रेश्माचा भाऊ प्रताप गायकवाड याने दिलेल्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(सौ. साम)

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!