नवी दिल्ली: जगावर पुन्हा एकदा नव्या माहामारीचं संकट येण्याची चिन्ह आहेत. नुकताच ४८,५०० वर्षांपूर्वीचा झोम्बी विषाणू बर्फात आढळला आहे.त्यामुळे या झॉम्बी विषाणूचा संसर्ग प्राणी आणि माणसांमध्ये होऊ शकतो, अशी भीती शास्त्रज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, हवामानातील बदलामुळे जागतिक तापमानवाढ झपाट्याने होत आहे. त्यामुळे बर्फातील पर्माफ्रॉस्ट झपाट्याने वितळत आहेत. बर्फातील पर्माफ्रॉस्ट वितळत असल्यामुळे दोन डझन विषाणू (Virus) पुन्हा एकदा पुनरुज्जीवित झाले आहेत. रशियातील एका तलावात ४८,५०० वर्षांपूर्वींचा झॉम्बी विषाणू बर्फात आढळून आला आहे. झॉम्बी विषाणू मनुष्यासाठी घातक असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, रिपोर्टनुसार, शास्त्रज्ञांनी १३ विषाणूंच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करून, त्यांनी त्यांना पुनरुज्जीवित केले आहे. यात शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, अनेक शतके बर्फात जमिनीखाली दबल्यानंतरही हे विषाणू संसर्गजन्य आहेत.