नवी दिल्ली: अफगाणिस्तानमधील एका शाळेत बुधवारी दुपारी भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण स्फोटामध्ये १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर २४ जण जखमी झाले आहेत.
माहितीनुसार, अफगाणिस्तानमधील मदरशात बुधवारी नमाज अदा करताना भीषण स्फोट झाल्याची मोठी घटना घडली आहे. या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानातील ऐबक शहरात झालेल्या भीषण स्फोटात २४ हून अधिक जण जखमी झाले आहेत.

सोशल मीडियातून समोर आलेल्या फोटोंमध्ये एका खोलीत मृतदेह आढळून आले आहेत. स्थानिक माध्यमांचं म्हणणं आहे की, ‘तालीबानच्या अधिकाऱ्यांकडून स्फोट झालेल्या ठिकाणाचा व्हिडिओ काढण्यास रोखण्यात आलं आहे’. तसेच या ठिकाणी सामान्य अफगाणिस्तानी नागरिकांना जाण्यास देखील बंदी आहे. या स्फोटाची अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी घेतली नाही.