जालना : राज्यचपाल भगतसिंग कोश्या्री यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्याद वक्तव्याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. यात आता जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी आक्रमक इशारा दिला आहे.

आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले, “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. आगामी राज्याचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यामुळे जोपर्यंत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आहे; तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिला आहे.