मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी भाषणात एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना थेट शिवाजी महाराज यांच्या आग्र्याच्या सुटकेच्या घटनेशी केली. त्यानंतर याबाबत विचारलं असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान आहेत. शिवरायांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत.
दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी भाषणात एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना थेट शिवाजी महाराज यांच्या आग्र्याच्या सुटकेच्या घटनेशी केली. त्यांच्या या विधानाचा निषेध केला जात आहे. तसेच मंगलप्रभात लोढा यांनी या विधानाबाबत स्पष्टीकरणही दिले आहे.