मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी भाषणात एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना थेट शिवाजी महाराज यांच्या आग्र्याच्या सुटकेच्या घटनेशी केली. त्यानंतर त्यांच्यावर चौफेर टिकेची झोड उठल्यांनतर मंगलप्रभात लोढा यांनी माध्यमांसमोर याबाबत सपष्टीकरण दिले आहे.
मंगलप्रभात लोढा म्हणाले, “माझं वक्तव्य कुणी पाहिले की नाही माहित नाही. मी शिवाजी महाराज यांची कुणाशी तुलना केली नाही. मी फक्त उदाहरण दिले होते. शिवाजी महाराज यांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही. शिवाजी महाराज सूर्य आहेत. हा राजकारणाच विषय नाही, यावर कुणी राजकारण करू नये. असं मंगलप्रभात यांनी म्हटलं.
