मुंबई: माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. माजी मंत्री मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांना आता कोठडीतच राहावे लागणार आहे.
माहितीनुसार, माजी मंत्री नवाब यांच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती रोकडे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, मलिक यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे त्यांचा पुढचा मुक्काम कोठडीतच असणार आहे.

दरम्यान, मलिक सध्या कुर्ला येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.