पुणे : ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांचं निधन झालं आहे. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. वर्षभरापूर्वी त्यांना कॅन्सरचे निदान झाले होते. आज वयाच्या 74 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत माळवली.

कविता, कथा, दीर्घकथा, कादंबरी, ललित गद्य आणि समीक्षा यांसह विविध प्रकारात त्यांनी साहित्य निर्मिती केली होती. तसेच 86व्या अ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरुही होते.