मुंबई: राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज, बुधवारी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना थेट शिवाजी महाराज यांच्या आग्र्याच्या सुटकेच्या घटनेशी केली. यावरून लोढा यांच्यावर टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी यावरून टीकास्त्र सोडलं आहे.

अमोल कोल्हे म्हणाले, “शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये थांबवता येत नसतील, तर येणाऱ्या शिवजयंतीला मुख्यमंत्र्यांनी किल्ले शिवनेरीवर पाय ठेवू नये, तसेच, लोढा यांना इतिहास माहिती असण्याची सुतराम शक्यता नाही. धक्कादायक बाब म्हणजे शंभूराजे यांनी त्यांच्या वक्तव्याचे समर्थन केलं आहे. म्हणजे शिंदे गटाचे समर्थन करत आहेत का? तत्काळ मंगलप्रभात लोढा यांनी माफी मागावी, असे मिटकरी म्हणाले.