मुंबई : शिंदे-भाजप सरकारमधील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना शिवरायांची केल्याने राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तर या वाचाळवीरांना आवरा असा सल्ला सत्तेतील वरिष्ठांना दिला आहे.
अजित पवार म्हणाले की, वाचाळवीरांना आवारा, आवरा, आवरा… सातत्याने आम्ही सांगतोय तरी देखील त्यांच्या मनामध्ये काही ना काही कल्पना येतात.हे बोलायला एक जातात परंतु त्याच्यातून अर्थ वेगळा निघतो. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकते का? हे महाराष्ट्रात कधी घडलंय का? हे देखील यांना कळत नाही. राज्यातील तमाम जनता यांना पाहत आहे. एकदा निवडणुका लागू द्या मग यांना कळेल, असा इशाराही पवार यांनी दिला दिला.
