मुंबई: प्रतापगडावर आज 363 वा शिवप्रतापदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह शिंदे फडणवीस सरकारमधील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केलं. त्यांच्यानंतर पर्यटनमंत्री मंगप्रभात लोढा यांनी सुद्धा भाषण करत उपस्थितांना संबोधित केलं.
यावेळी प्रतापगडावरील उपस्थिताना संबोधित करताना मंगलप्रभात लोढा म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांना औरंगाजेबाने पकडून आग्र्याच्या किल्ल्यात जेव्हा बंदीस्त केलं होतं. त्यावेळी शिवाजी महाराज हे स्वत: साठी नाही तर हिंदवी स्वराज्यासाठी युक्ती काढत सुटका करून घेतली. त्यामुळेच भारतात हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. असाच प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचा झाला. पण एकनाथ शिंदे यांनी सुद्धा तशीच सुटका करून घेतली आणि महाराष्ट्रात हिंदुत्वाचं सरकार स्थापन झालं, असं मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत तुलना केल्याने मोठा वाद निर्माण होऊ शकतो.