Latest Marathi News

BREAKING NEWS

 

आटपाडी तालुक्यात पहिलाच लघुपट महोत्सव. प्रवेशिका सादर करण्याचा आज शेवटचा दिवस.

0 1,162

 

 

गदिमा लघुपट महोत्सव 2022 आटपाडी, जि.सांगली येथे आयोजित करण्यात आला आहे. ग.दि.माडगूळकर यांच्या जयंती पासून म्हणजेच दिनांक 1 ऑक्टोबर 2022 पासून लघुपट, डॉक्युमेंटरी व अल्बम सॉंग प्रवेशिका ऑनलाईन स्वीकारणे सुरू असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नामांकित कलाकृती यामध्ये सहभागी होत आहेत.

 

आज 30 नोव्हेंबर 2022 अखेर प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहेत. दाखल झालेल्या कलाकृतीचे परिक्षण प्रा.बापूसाहेब चंदनशिवे, आर्ट कॉलेज अहमदनगर,चित्रपट लेखक दिग्दर्शक महेश बनसोडे मुंबई व बालाजी वाघमोडे आटपाडी हे करणार आहेत. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाना अनुक्रमे रुपये 7777/-, 5555/-, 3333/- रोख बक्षिस आकर्षक ट्रॉफी व प्रमाणपत्र, तर उत्कृष्ट दिग्दर्शक, लेखक, कॅमेरामन, संकलक, पार्श्वसंगीत, अभिनेत्री, अभिनेता, बालकलाकार, उत्कृष्ट डॉक्युमेंटरी, उत्कृष्ट अल्बम सॉंग, उत्कृष्ट स्थानिक कलाकृती अशा 15 पेक्षा जास्त प्रकारामध्ये प्रथम क्रमांकाला रुपये 2222/- तसेच सर्व विजेत्या प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाना सन्मानपूर्वक आकर्षक ट्रॉफी व प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना इ प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

 

दिनांक 14 डिसेंबर 2022 रोजी ग.दि.माडगूळकर यांच्या पुण्यतिथी दिनी विजेत्यांची नामांकन यादी जाहीर करण्यात येणार आहे. बक्षीस वितरण दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी कल्लेश्वर हॉल आटपाडी येथे साहित्यिक सुमित्र माडगूळकर, राष्ट्रपती पारितोषिक विजेते बार्डो चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक भीमराव मुढे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. पंचम फिल्म्सच्या वतीने हा लघुपट महोत्सव आयोजित करण्यात आला असून, श्री.समाधान ऐवळे व अनिषा जावीर हे फेस्टिव्हल डायरेक्टर म्हणून काम पाहत आहेत. या लघुपट महोत्सवात कलाकृती सहभागी करण्यासाठी मोबाईल क्रमांक 8805441122/ 7447582006 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.