नवी दिल्ली: सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण झाली आहे . बुधवारी २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या दरात १३६ रुपयांची घसरण नोंदवली गेली. मंगळवारी (२९ नोव्हेंबर) सुद्धा सोन्याचे भाव १०१ रुपयांनी कमी झाले होते. तर, बुधवारी चांदीचा भाव प्रतिकिलो ५२० रुपयांनी कमी झाला आहे.
माहितीनुसार, बुधवारी सराफा बाजारात सोन्याचा भावात १३६ रुपयांची घसरण झाल्याने २४ कॅरेट शुद्धतेचा सोन्याचा भाव प्रतितोळा ५२ हजार ८३७ रुपयांवर आला आहे. दुसरीकडे २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव प्रतितोळा ४८ हजार २८७ इतका आहे.
दरम्यान, भारतात सध्या सगळीकडे लग्नाचा सिझन सुरू आहे. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची खरेदी करत आहेत. येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात वाढ होईल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.