नवी दिल्ली : भारतासोबत सुरू असलेल्या वादात ढवळाढवळ करू नका, अशी थेट धमकी चीनने अमेरिकेला दिली आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय पेंटागॉनने काँग्रेसला सादर केलेल्या अहवालात चीनने धमकी दिल्याचा दावा केला आहे.
चीनचे म्हणणे आहे, की चीन भारताच्या सीमेवर असलेल्या तणाव कमी करु इच्छित आहे. जेणेकरून चीन आणि भारताचे संबंध सुधारतील आणि दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या व्यापारावर याचा परिणाम होणार नाही. भारत आणि चीनचे संबंध सुधारत असताना, अमेरिकेने यामध्ये ढवळाढवळ करू नये, असं चीनने म्हटलं आहे.
दरम्यान, चीनने अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना भारतासोबतच्या संबंधांमध्ये हस्तक्षेप करू नये, केल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी थेट धमकी दिली आहे.