Latest Marathi News

BREAKING NEWS

 

धावत्या बसमध्ये प्रवाशाची गळा चिरुन हत्या!

0 846

पालघर: पालघर जिल्ह्यात एका धावत्या बसमध्ये प्रवाशाची गळा चिरून हत्या झाली आहे. हत्या झालेल्या प्रवाशाची ओळख पटवण्यासाठी सध्या पोलीस प्रयत्न करत आहेत.

 

 

माहितीनुसार, ही घाटकोपर येथून उदयपूरला जाणाऱ्या धावत्या स्लीपर कोच बसमध्ये एका इसमाचा गळा चिरून हत्या झाली आहे. घाटकोपर येथून निघालेली ही बस राजस्थानमधील उदयपूर येथे जात होती.घोडबंदरहून बसमध्ये बसलेला एक अनोळखी प्रवासी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसल्याने इतर सहप्रवासी आणि बस चालकाने त्याला कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांकडून घोषित करण्यात आले.

 

दरम्यान, या प्रवाशाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचं उघडकीस आलं आहे. यानंतर कासा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रवासाची ओळख पटवण्याचे काम सध्या पोलिसांमार्फत सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.